नित्यसाई निर्मिती संस्था
ठाणे शहरातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तकनगरमधील श्री साईबाबा मंदिराचे पुजारी किशोर म्हसकर यांनी श्री साईबाबा या ऍनिमेशनपटाची निर्मिती केली आहे.
श्री नित्यानंदस्वामींच्या आशिर्वादामुळे प्रेरित झालेल्या श्री किशोर म्हसकर गुरुजी यांनी अतिशय लहान वयापासूनच वेद मंत्र यांचे पठण सुरु केले. एके दिवशी एक चमत्कार झाला. गुरुजींना सलग ३ दिवस स्वप्नामध्ये श्री साईबाबांचे दर्शन झाले. श्री साईबाबांच्या आशिर्वादाने प्रेरणा घेऊन त्यांनी कुंडलीच्या आधारे लोकांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. आज प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तकनगर येथील श्री साईबाबांच्या मंदिराचे गुरुजी मुख्य पुजारी म्हणून कार्यरत आहेत. श्री किशोर म्हसकर गुरुजींनी नित्यसाई निर्मिती संस्थेद्वारे श्री साईबाबा या ऍनिमेशपटाची निर्मिती केली आहे.
पर्यावरण वाचवणे, मुक्या प्राण्यांवर दयाभाव दाखवणे, हिंदू-मूसलमान असा भेदभाव न करता सर्वधर्मसमभाव असावा अशी शिकवण लहानपणीच मुलांना मिळावी या उद्देशाने या ऍनिमेशनपटाची निर्मिती करण्यात आली आहे. श्री साईबाबा या ऍनिमेशनपटास लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आणि त्यामुळेच नित्यसाई निर्मिती संस्थेने आता श्री साईबाबा भाग २ काढण्याचे योजिले आहे.श्री साईबाबा भाग २ मध्ये अनेक गोष्टी आपणास पहावयास मिळतील ज्या श्री साईबाबा भाग १ मध्ये समाविष्ट नाहीत.
त्याचप्रमाणे नित्यसाई संस्थेने श्री गजानन महाराज यांच्या जीवनपटावर आधारित ऍनिमेशनपट काढण्याचे योजिले आहे |
|