PDF Print E-mail

मराठी ऍनिमेशनपट

 

नित्यसाई निर्मिती संस्थेने ५० मिनिटांचा ऍनिमेशन चित्रपट बनवला आहे. श्री साईबाबांची जीवनगाथा आपण या ऍनिमेशनपटात पाहू शकता. खासकरुन लहान मुलांसाठी हा ऍनिमेशनपट बनवण्यात आला आहे.

 

सध्या ऍनिमेशनपट हे लहान मुलांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. श्री साईबाबांचा या ऍनिमेशनपटामुळे साईबाबांची शिकवण गोष्टी स्वरुपात लहान मुलांपर्यंत पोहोचू शकेल.

 

हिंदी आणि मराठीमध्ये असणारा हा ऍनिमेशनपट गुजराथी, कन्नड तसेच तेलगु भाषांमध्ये काढण्याचा नित्यसाई निर्मिती संस्थेचा मानस आहे.

 

या ऍनिमेशनपटसाठी पं. किसन शर्मा यांनी गाणे लिहिले असून भजनसम्राट अनुप जलोटा यांनी गीत गायले आहे. संगीत विष्णु आढाव यांचे आहे. ऍनिमेशन पंकज बच्छाव, योगेश सुतार व मिथुन मेनन यांनी केलेले आहे.