|
|
|
|
श्री साईबाबांचे प्रत्येक भाविकांच्या मनातील अढळ असे स्थान आहे.श्री साईबाबांनी कोणताही धार्मिक ग्रंथ लिहिला नाही. परंतु त्यांनी आपल्या सामर्थ्याने अनेक चमत्कार करुन लोकांचा परमेश्वरावरील विश्वास कायम ठेवला. त्यांनी अनेक लोकांच्या आयुष्यातील संकटे दूर केली. अनेकांना जीवनदान दिले.
साईबाबांनी अनेक केवळ चमत्कारच केले नाहीत तर त्यातून योग्य अशी शिकवण लोकांना दिली. प्राणीमात्रांवर दया करावी, हिंदू-मुस्लिम भेदभाव नको. देवाच्या अल्लाच्या चरणी आपण सगळे एकच आहोत. अशा अनेक बोधकारक अशा गोष्टी त्यांनी लोकांना पटवून दिल्या.
जेव्हा लोक आपापसात भांडत असत तेव्हा साईबाबा म्हणत "कोण कोणाशी भांडत आहे, याबद्दल जरा विचार करा." साईबाबा असे पटवून द्यायचे की देव प्रत्येक ठिकाणी आहे. आणि म्हणूनच कधीही कोणाचा तिरस्कार करु नये.साईबाबा म्हणत असत की. "कोणीही कधीही विसरु नये की मी , तुम्ही आणि सर्व जग हे परमेश्वराचाच भाग आहे."
साईबाबांच्या मते परमेश्वरापुढे नतमस्तक होतानाच आपण सामर्थ्यवान होत असतो. साईबाबांनी लोकांना जगण्यामधील अर्थ योग्य प्रकारे समजावून सांगितला आणि म्हणूनच भाविक अधिक चांगल्या प्रकारे आयुष्याचे महत्व समजू शकले. |


