श्री. अनुप जलोटा
श्री. अनुप जलोटा यांचा जन्म २६ जुलॆ १९५३ साली नॆनिताल येथे झाला. त्यांनी संगीताची सुरुवात वयाच्या पाचव्या वर्षापासुन केली. शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांनी लखनौ येथील भातखंडे विद्यापीठातून घेतले. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी त्यांचे पहिले गीत ध्वनिमुद्रित केले. १९७३ साली अनुपजींनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळी त्यांनी संगीतसाधनाही कायम ठेवली. आज अनुपजी भारतातील ख्यातनाम भजनसम्राट म्हणून ओळखले जातात. त्यांनी गायलेल्या भक्तिगीतांमधून लोकांना विलक्षण अनुभुती प्राप्त होते. अनुपजींनी ५०० पेक्षा जास्त भजने तसेच १२० गजल गीतेही गायली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी हिंदीप्रमाणेच बंगाली, पंजाबी, मराठी भाषेतही अनेक गीते गायली आहेत. |
|